महाराष्ट्र

औरंगाबाद : MIT कॉलेजच्या पुस्तक प्रदर्शनावरून वाद; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप; सामाजिक कार्यकर्त्यांची पोलिस अधीक्षक, औरंगाबाद यांच्याकडे तक्रार; चौकशीची मागणी

औरंगाबाद : शहरातील MIT कॉलेज, बीड बायपास येथे आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनातील एका पुस्तकावरून वाद निर्माण झाला असून, त्या पुस्तकातील मजकूरामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. या संदर्भात पोलिस अधीक्षक कार्यालयात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ५ मार्च २०२६ रोजी MIT कॉलेजमध्ये पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात विविध विषयांवरील अनेक पुस्तके ठेवण्यात आली होती. तक्रारदारांचे म्हणणे आहे की या पुस्तकांपैकी एका पुस्तकात असा मजकूर प्रकाशित करण्यात आला आहे, ज्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात आणि समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की शैक्षणिक संस्थांमध्ये अशा प्रकारच्या वादग्रस्त किंवा आक्षेपार्ह साहित्याचे प्रदर्शन केल्यास समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो आणि सामाजिक सलोखा बिघडू शकतो. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
या संदर्भात मुदस्सिर अन्सारी, सय्यद फुरकान अली, इमरान अली, मीर शौकत अली आणि उस्मान अली यांनी संयुक्तपणे पोलिस अधीक्षक, औरंगाबाद यांना निवेदन देत प्रकरणाची चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य पावले उचलावीत, अशी मागणीही करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!